ओबीसींच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:46 IST2017-07-25T00:46:45+5:302017-07-25T00:46:45+5:30

ओबीसी समाजाचे दिवसेंदिवस कमी होणारे आरक्षण व ओबीसींच्या इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी...

Thinking on OBC's various questions | ओबीसींच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन

ओबीसींच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : ओबीसी समाजाचे दिवसेंदिवस कमी होणारे आरक्षण व ओबीसींच्या इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी विविध राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक शनिवारी दिल्लीत बोलावली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर यांनाही निमंत्रित करण्यात आले. या बैठकीत दरेकर यांनी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न, समस्या राहूल गांधी यांच्यासमोर मांडल्या.
बैठकीत राहूल गांधी यांनी राज्यातील नेत्यांकडून ओबीसींचे प्रश्न समजून घेतले. मेडिकल प्रवेशामध्ये ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले आहे. या प्रश्नावर आक्रमक होण्याच्या सूचनाही राहूल गांधी यांनी केले.

Web Title: Thinking on OBC's various questions