वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती अजुनही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:56+5:302021-09-19T04:37:56+5:30

गडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील २५० वृद्ध कलावंत मानधनापासून प्रतीक्षेत ...

There is still no non-governmental committee of older artists | वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती अजुनही नाही

वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती अजुनही नाही

गडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील २५० वृद्ध कलावंत मानधनापासून प्रतीक्षेत आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने गडचिराेली जिल्ह्यात वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती नेमावी, अशी मागणी वृद्ध कलावंतांकडून हाेत आहे.

वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे पाठविले जातात. गेल्या तीन वर्षांपासून शेकडाे वृद्ध कलावंतांचे मानधनाचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे तयार आहेत. परंतु अशासकीय समितीची निवड न झाल्याने हे प्रस्ताव तसेच थंड बस्त्यात पडून आहेत.

गडचिराेली जिल्हा हा झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा जिल्हा आहे. येथे दंडार व लाेककला सादर करणारे अनेक कलावंत आहेत. या कलावंतांना मानधनाच्या माध्यमातून दिलासा देण्याकरिता समिती गठित करणे गरजेचे आहे.

Web Title: There is still no non-governmental committee of older artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.