बेडची कमतरता नाही, पण रेमडेसिविरचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:53+5:302021-04-20T04:37:53+5:30
मागील १५ दिवसांपासून राज्यभरात रेमडेसिविर लसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका गडचिराेली जिल्ह्यालाही बसला आहे. मागणीच्या तुलनेत लस ...

बेडची कमतरता नाही, पण रेमडेसिविरचा तुटवडा
मागील १५ दिवसांपासून राज्यभरात रेमडेसिविर लसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका गडचिराेली जिल्ह्यालाही बसला आहे. मागणीच्या तुलनेत लस कमी प्रमाणात उपलब्ध हाेत असल्याने लससाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.
बाॅक्स
ऑक्सिजनचे ३८४ बेड रिकामे
काेराेनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची ऑक्सिजनची पातळी कमी हाेण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे त्या रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यावे लागते. ऑक्सिजन ही अतिशय महत्त्वाची बाब काेराेना रुग्णांसाठी आहे. जिल्हाभरातील रुग्णालयांमध्ये एकूण ५८० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात ३५०, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात २०, आरमाेरीत २०, अहेरी येथे १००, एटापल्ली ५० व सिराेंचा येथे ४० ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत १९६ रुग्ण ऑक्सिजन बेडवर असून, अजूनही ३८४ बेड रिकामे आहेत. या व्यतिरिक्त ऑक्सिजनचे सिलिंडर लावूनही उपचार घेता येते. आकस्मिक स्थितीत ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी प्रत्येक काेविड केअर सेंटरवर ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. यावरून जिल्ह्यात ऑक्सिजन बेड व ऑक्सिजनची कमतरता नसल्याचे दिसून येत आहे.
साैम्य लक्षणे असलेलेही रुग्णालयात
काेराेनामुळे मृत्यूची संख्या मागील आठ दिवसांमध्ये वाढली आहे. त्यामुळे काही रुग्ण अतिशय सामान्य लक्षणे असतानाही रुग्णालयात दाखल हाेऊन उपचार घेत आहेत. आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास अशा रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला देता येणे शक्य आहे; मात्र सध्या पुरेसे बेड उपलब्ध असल्याने घरीच उपचार करायचे की रुग्णालयात दाखल व्हायचे, या दाेन पर्यायांपैकी काेणता पर्याय निवडायचा, हे रुग्णाला ठरवून दिले जाते.
रुग्णालयातील बेड
एकूण बेड ७७२
रिकामे बेड २१३
ऑक्सिजन बेड ५८०
रिकामे बेड ३८४
काेविड केअर सेंटरमधील बेड
एकूण बेड १२१७
रिकामे बेड ३०९
रुग्णालयनिहाय उपलब्ध बेड
नाव व्यस्त बेड रिकामे बेड
जिल्हा रुग्णालय २४४ ६७
नर्सिंग स्कूल १३३ ३१
धर्मशाळा ७२ २
देसाईगंज ९८ २
आरमाेरी ७९ ८
सिराेंचा १६ ३९
चामाेर्शी ७५ ४
अहेरी ५१ ५८
एटापल्ली ४३ १६
कुरखेडा १४९ ३६
गडचिराेली केंद्र २३७ १३२
धानाेरा ५१ ३०
काेरची ७२ ९
अहेरी केंद्र ९० १५
भामरागड १६ २८
सिराेंचा ४१ ४५