बलात्कार प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही
By Admin | Updated: February 27, 2015 01:22 IST2015-02-27T01:22:02+5:302015-02-27T01:22:02+5:30
बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या प्रकाश सहारे यांच्या पत्नी कल्पना सहारे व कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत आमचे नाव बदनामी करण्याच्या हेतूने घेतलेले आहे.

बलात्कार प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही
गडचिरोली : बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या प्रकाश सहारे यांच्या पत्नी कल्पना सहारे व कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत आमचे नाव बदनामी करण्याच्या हेतूने घेतलेले आहे. आमचा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही, अशी माहिती मेघराज डोमाजी राऊत व सुधीर लक्ष्मण वालदे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे २१ फेब्रुवारी रोजी मेघराज राऊत व २३ फेब्रुवारी रोजी सुधीर वालदे यांची पिडीत मुलीसमोर व तिच्या आई समक्ष दोनदा वारंवार विचारणा पोलीस उपनिरीक्षक गोरे व पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी केली. तोंडओळखसुद्धा करण्यात आली. परंतु मुलीने व तिच्या आईने यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आम्ही यांना पाहिलेसुद्धा नाही, असे स्पष्टपणे सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आमचा संबंध नसल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले. कल्पना सहारे यांच्या पतीबद्दल आमचा काहीही वैरभाव नाही व कोणत्याही प्रकारची मारहाण केलेली नाही. कल्पना सहारे यांनी पत्रकार परिषदेत केलेला आरोप खोटा व बनावट आहे. आमची समाजात बदनामी करण्याच्या हेतूने गैरसमज पसरविण्यात येत आहे, असे मेघराज राऊत व सुधीर वालदे यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)