शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

काेराेना प्रतिबंधक लस आवश्यक प्रमाणात उपलब्ध असूनही घेणारा काेणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

राेग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस द्यावी, याकरिता शासन-प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ५ ते १० जून या पाच दिवसात दररोज लस घेणारे  कमीत-कमी दहा जण येणे आवश्यक हाेते. परंतु तसा प्रतिसाद मिळाला नाही. वॅक्सिनची एक बाॅटल फाेडल्यानंतर १० जणांना लस द्यावी लागते. ही लस घेण्यासाठी येथील केंद्रावर १० च्या आत कमी लाेक लस घेण्यासाठी येत हाेते.

ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यातील स्थिती : पाच दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण बंद

रवी रामगुंडेवारलाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : काेराेना प्रतिबंधक  लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांना लस मिळत नव्हती. ऑनलाईन नाेंदणी करण्यासाठी अनेक अडचणी येत हाेत्या. शहरी भागासह ग्रामीण भागातही ही समस्या हाेती; परंतु दुर्गम तालुक्यांमध्ये वेगळीच स्थिती दिसून येत हाेती. अनेकांच्या घरी जाऊन लस घेण्याबाबत सांगितले जात हाेते. त्याला थाेडाफार प्रतिसाद मिळत हाेता. मात्र आता एटापल्लीसारख्या दुर्गम तालुक्यात ही स्थिती बदललेली दिसून येते. काेराेना प्रतिबंधक लस उपलब्ध असूनही तालुक्यातील नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीकरणाकडे पाठ फिरविली. त्यामुळे एटापल्ली ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र पाच दिवसांपूर्वी बंद करण्यात आले.राेग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस द्यावी, याकरिता शासन-प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ५ ते १० जून या पाच दिवसात दररोज लस घेणारे  कमीत-कमी दहा जण येणे आवश्यक हाेते. परंतु तसा प्रतिसाद मिळाला नाही. वॅक्सिनची एक बाॅटल फाेडल्यानंतर १० जणांना लस द्यावी लागते. ही लस घेण्यासाठी येथील केंद्रावर १० च्या आत कमी लाेक लस घेण्यासाठी येत हाेते. परिणामी  लस वाया जाण्याची शक्यता हाेती. त्यामुळे १० लाेक गाेळा झाल्यानंतरच लस द्यावी, असे निर्देश वरिष्ठांकडून आराेग्य कर्मचाऱ्यांना मिळाले हाेते. येथे लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या १० हाेईपर्यंत प्रतीक्षा केली जात हाेती. अनेकदा १० लाेक येत नव्हते. त्यामुळे आलेल्यांना परत पाठवावे लागत हाेते. फाेन करून परत बाेलाविले जाईल, असेही लाेकांना सांगितले जात हाेते. परंतु फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पंधरवड्यात पाच ते सहा जण लस घेण्याकरिता येत हाेते. ही स्थिती लक्षात घेऊन पर्यायाने पाच दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले. एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रात ४५ वर्षांवरील केवळ १ हजार ८९३ जणांनी लस घेतली. यात पहिला डोस १ हजार ४०७ तर दुसरा डोस ४८६ जणांनी घेतला.

पीएचसी स्तरावरील लसीकरणएटापल्ली तालुक्यात चार प्राथमिक आराेग्य केंद्र आहेत. या केंद्रांतर्गत लसीकरण करण्यात येत आहे. कसनसूर प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत १ हजार ६५३, ताेडसा आराेग्य केंद्रांतर्गत ७२४, बुर्गी केंद्रांतर्गत १ हजार २८ तर गट्टा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत ४०९ लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. यामध्ये काही लाेकांनी दुसरा डाेसही घेतला आहे. तालुक्यात प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत काेविशिल्डचा पहिला डाेस ३ हजार ५८१ लाेकांनी तर दुसरा डाेस १ हजार ३९३ अशा एकूण ४ हजार ९७४ लाेकांनी घेतला. तर काेव्हॅक्सिनचा पहिला डाेस ७२२ लाेकांनी व दुसरा डाेस २२९ लाेकांनी घेतला. एकूण ९५१ लाेकांनी काेव्हॅक्सिनचा डाेस घेतला.

स्थिती झाली उलटएटापल्ली तालुक्यात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाच्या सुरुवातीला लस घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यावेळी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. लसीकरणासाठी आलेले नागरिक परत जात हाेते. परंतु आता याउलट चित्र आहे. लसीचा साठा असूनही नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवित आहेत. दुर्गम भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनास्था आहे काय की लसीकरण पूर्ण हाेण्याकडे वाटचाल सुरू आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या