शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

रमाई घरकुलांसाठी निधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM

जून महिन्यात पहिला हप्ता प्राप्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. पावसाळा असल्याने निधी दिला नसावा अशी आशा बाळगून जानेवारी महिन्यापर्यंत लाभार्थी निधीची प्रतीक्षा करीत होते. मात्र जानेवारी तर सोडाच आता २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपून तीन महिन्याचा कालावधी संपला आहे. मात्र रूपयाचाही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे एकाही घराच्या बांधकामाला सुरूवात झाली नाही.

ठळक मुद्देसव्वा वर्ष उलटले : जिल्हाभरातील ९०८ घरांना मंजुरी, अनुसूचित जातीचे लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यासाठी ९०८ घरे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सव्वा वर्ष उलटूनही रूपयाचाही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्हाभरात एकाही लाभार्थ्याने घर बांधकामाला सुरूवात केली नाही.अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना घरकूल बांधून देण्यासाठी शासनामार्फत रमाई घरकूल योजना राबविली जाते. दरवर्षी या योजनेंतर्गत जिल्हाभरात १०० ते १५० एवढेच घरकूल मंजूर केले जात होते. लाभार्थ्यांपेक्षा घरांची संख्या कमी असल्याने अनेक लाभार्थ्यांना योजनेपासून वंचीत राहावे लागत होते. मात्र मागील वर्षी म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षात सुमारे १ हजार ३०७ घरकूल लाभार्थ्यांना घरकूल देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. अर्ज व इतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ९०८ घरकूल बांधमास मंजूरी प्रदान करण्यात आली.घरकूूल मंजूर झाल्याने लाभार्थी जाम खूश होते. मागील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत मंजुरीचे काम आटोपले. जून महिन्यात पहिला हप्ता प्राप्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. पावसाळा असल्याने निधी दिला नसावा अशी आशा बाळगून जानेवारी महिन्यापर्यंत लाभार्थी निधीची प्रतीक्षा करीत होते. मात्र जानेवारी तर सोडाच आता २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपून तीन महिन्याचा कालावधी संपला आहे. मात्र रूपयाचाही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे एकाही घराच्या बांधकामाला सुरूवात झाली नाही.पंचायत समितीत येरझाराघरकूल मंजूर झालेले लाभार्थी पंचायत समितीत जाऊन निधीची विचारना करीत आहेत. काही लाभार्थी तर थेट जिल्हा स्तरावरील कार्यालयात भेट देत आहेत. मात्र शासनानेच निधी दिला नसल्याने आपण काय करणार असे उत्तर अधिकारी व कर्मचारी देत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात घरकूल मंजूर झाल्याने घराचे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र निधीच मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये शासनाप्रती नाराजी व्यक्त केली जात आहे.लॉकडाऊनमुळे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे शासनाकडे निधी नाही, असे कारण सांगीतले जात आहे. मात्र घरकूल ही अत्यंत महत्त्वाची योजना असल्याने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.राज्यभरातील लाभार्थ्यांचीही अशीच स्थितीशासनाने रमाई घरकूल योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकूल मंजूर केले आहे. मात्र अजूनपर्यंत राज्यातील एकाही जिल्ह्याला या योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे राज्यभरातील अनुसूचित जातीच्या घरकूल लाभार्थ्यांची निराशा झाली आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना