एकाही सोनोग्राफी केंद्र संचालकाविरोधात तक्रार नाही
By Admin | Updated: March 9, 2017 01:44 IST2017-03-09T01:44:26+5:302017-03-09T01:44:26+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १७ सोनोग्राफी केंद्र आहेत. या सोनोग्राफी केंद्राची जानेवारी ते मार्च अशी त्रैमासिक पासणी करण्यात आली

एकाही सोनोग्राफी केंद्र संचालकाविरोधात तक्रार नाही
जिल्हास्तरीय दक्षता पथक समितीच्या बैठकीत माहिती
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १७ सोनोग्राफी केंद्र आहेत. या सोनोग्राफी केंद्राची जानेवारी ते मार्च अशी त्रैमासिक पासणी करण्यात आली असून यामध्ये एकाही सोनोग्राफी केंद्रात त्रूट्या आढळून आल्या नाही. आतापर्यंत आठ केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकही डॉक्टर तसेच सोनोग्राफी केंद्र संचालकाविरोधात तक्रार नाही, अशी माहिती उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा सोमवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. शेंद्रे, अशासकीय सदस्य लाडवे, सुरेश बारसागडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे लिपीक प्रभाकर कोटरंगे आदी उपस्थित होते.
सोनोग्राफी केंद्राबाबतची न्यायालयीन प्रकरणे निरंक आहेत. जिल्ह्यात एकही डीकॉय केसेसे अथवा स्टिंग आॅपरेशन करण्यात आले नाही. कारण टोल फ्री क्रमांक तसेच संकेतस्थळावर जिल्ह्यातील एकही डॉक्टर व सोनोग्राफी केंद्र संचालकांविरोधात तक्रार नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये देसाईगंजचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप कांबळे यांच्या खासगी सोनोग्राफी केंद्रास मान्यता मिळण्याबाबतच्या अर्जावर चर्चा करण्यात आली. ८ मार्च २०१७ रोजी पीसीपीएनडीटी अंतर्गत समुचित प्राधिकारी यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सभेत दिली. (स्थानिक प्रतिनिधी)