शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत अन्नपदार्थ तपासणीची लॅबच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 17:36 IST

Gadchiroli : नागपूर, पुणे, मुंबईला पाठवतात नमुने

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विविध सण, उत्सव, कार्यक्रमांत विविध वस्तूंची खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात होते. यात मिठाई, फराळ व अन्य वस्तूंचाही समावेश असतो; परंतु याच कालावधीत भेसळ व बनावट खाद्यपदार्थ किंवा मिठाई घरी येण्याचा धोका असतो. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नमुने घेतले जातात; मात्र जिल्हास्थळी गडचिरोली येथे नमुने तपासणीची लॅब नसल्याने तपासणीनंतरचा अहवाल दोन ते तीन किंवा चार ते पाच महिन्यांपर्यंत प्राप्त होत नाही. परिणामी संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया लांबणीवर पडते.

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागात अनेक पदे रिक्त आहेत. अन्न विभागात दोन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदे मंजूर असले तरी केवळ एकच पद भरलेले आहे. याशिवाय लिपिकवर्गीय व अन्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच संपूर्ण जिल्ह्यात तपासणी करण्याचा भार असतो. नमुने गोळा केल्यानंतर कागदपत्रे तयार करणे, नमुन्यांची पॅकिंग करणे, पत्र पाठविणे तसेच संबंधित नमुन्यांची प्रक्रिया कुठपर्यंत आली, याबाबतचाही पाठपुरावा त्याच अधिकाऱ्यांना घ्यावा लागतो. सोबतच जिल्ह्याच्या विविध भागांत भेटी देऊन तपासणीही करावी लागते. गडचिरोली जिल्ह्यात खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची लॅब नाही. जिल्ह्यातील नमुने सुरुवातीला नागपूर येथे पाठवावे लागतात. नागपूर येथे अनेक जिल्ह्यांतून नमुने तपासणीसाठी यापूर्वीच आलेले राहत असल्याने मागाहून आलेले नमुने तपासणीसाठी उशीर होतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी विशिष्ट ठिकाणची लॅब ठरवून दिली असल्याने तेथेच सुरुवातीला नमुने पाठवावे लागतात. परिणामी तपासणीसाठी उशीर होतो.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षअन्नपदार्थ तपासणी लॅब निर्माण करण्याची मागणी काही वर्षांआधी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. निवेदनही दिले. मात्र शासन तसेच लोकप्रतिनिधींनी हा विषय फार गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे येथे लॅब झाली नाही.

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागGadchiroliगडचिरोलीscienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञानnagpurनागपूरPuneपुणेMumbaiमुंबई