सिरोंचा येथे सर्वच जागांसाठी काट्याची लढत
By Admin | Updated: April 19, 2015 01:23 IST2015-04-19T01:23:01+5:302015-04-19T01:23:01+5:30
१५ सदस्य असलेल्या सिरोंचा ग्राम पंचायतीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच सर्वच जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी काट्याची लढत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सिरोंचा येथे सर्वच जागांसाठी काट्याची लढत
सिरोंचा : १५ सदस्य असलेल्या सिरोंचा ग्राम पंचायतीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच सर्वच जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी काट्याची लढत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सिरोंचा ही तालुकास्तरावरील ग्राम पंचायत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे या ग्राम पंचायतीकडे लक्ष लागले आहे. २०१० साली या ग्राम पंचायतीची निवडणूक झाली होती. त्यावेळी १५ सदस्यांपैकी १२ सदस्य अविरोध निवडून आले होते. फक्त तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. विशेष म्हणजे अविरोध निवडून आलेल्यांमध्ये तलांडी कुटुंबातील चार सदस्य होते. यावर्षी मात्र एकही जागा अविरोध निवडून येणार नाही. प्रत्येकाला आपली ताकद दाखवावी ल२ागणार आहे.
२०१० च्या निवडणुकीत केवळ प्रभाग दोन, तीन व चारमधील एका सदस्यासाठी निवडणूक झाली होती. मागील वेळी निवडणूक जिंकल्यांमध्ये वार्ड क्रमांक दोन मधील मानसुरी रत्नमाला यावर्षीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला मात्र तो त्यांनी परत घेतला आहे. वार्ड क्रमांक तीन मधून निवडून आलेले अब्दुल रहीम हे उपसभापती पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे ते निवडणूक रिंगनात नाहीत. वार्ड क्रमांक चारमधील सदस्य चल्लम रमेश मकय्या हे गतवर्षी २२३ मतांनी जिंकून आले होते. यंदा ते त्याच वार्डातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात सहा उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. मागील वेळेला सरपंच पद एस. टी. साठी राखीव होते. यावर्षी मात्र हे पद एस. टी. महिलेसाठी राखीव ठेवली आहे. त्यामुळे महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. (शहर प्रतिनिधी)