...तर माेकाट गुरे व डुकर मालकांवर गुन्हे दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:25+5:302021-08-25T04:41:25+5:30
गडचिराेली : माेकाट जनावरे व डुकरांचा ठिय्या शहरातील विविध रस्त्यांवर व चाैकाचाैकात असताे, शिवाय कळपा-कळपाने जनावरे आवागमन करीत असतात. ...

...तर माेकाट गुरे व डुकर मालकांवर गुन्हे दाखल करणार
गडचिराेली : माेकाट जनावरे व डुकरांचा ठिय्या शहरातील विविध रस्त्यांवर व चाैकाचाैकात असताे, शिवाय कळपा-कळपाने जनावरे आवागमन करीत असतात. अशा जनावरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत, नगरपालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून माेकाट गुरे व डुक्कर पकडण्याची माेहीम हाती घेतली आहे. त्यामुळे मालकांनी आपली माेकाट गुरे व डुक्कर याेग्यरीत्या ठेवावीत. रस्त्यावर फिरून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास संबंधित जनावर व डुक्कर मालकांवर फाैजदारी गुन्हे दाखल करणार, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी संजीव ओहाेळ यांनी अधिनस्त विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांना माेकाट जनावरे व डुक्कर बंदाेबस्त माेहीम वेगात राबविण्याचे आदेश दिले आहेत. जनावर मालकांनी आपल्या आपल्या जनावरांबाबत खबरदारी घ्यावी. रस्त्यावर माेकाट गुरे साेडू नये, अन्यथा गुरे मालकांच्या विराेधात गडचिराेली पाेलीस ठाण्यात भारतीय दंडविधान २८९, २९०, तसेच सार्वजनिक ठिकाणचा उपद्रव थांबविला नाही, तर कलम २९१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी न.प.प्रशासनातर्फे शिफारस करण्यात येईल, असे मुख्याधिकारी ओहाेळ यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जनावरे पकडण्याची माेहीम सुरू असून, आतापर्यंत जनावर मालकांकडून एकूण १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे गुरे व डुक्कर मालकांनी आपली जनावरे व डुकर बंदिस्त ठेवावे, अन्यथा माेकाट गुरे व डुकरांना पकडून बाहेर साेडण्यात येईल, असे नगरपालिका प्रशासनाने कळविले आहे.