पोर्ला येथे चोरी, दीड लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: May 24, 2015 02:13 IST2015-05-24T02:13:44+5:302015-05-24T02:13:44+5:30
तालुक्यातील पोर्ला येथे चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री एका शिक्षकाच्या घरी चोरी करुन सोन्या-चांदीचे दागिने

पोर्ला येथे चोरी, दीड लाखांचा ऐवज लंपास
गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला येथे चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री एका शिक्षकाच्या घरी चोरी करुन सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला.
वसा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले योगराज आलाम हे पोर्ला येथील पंढरीनाथ शिवणकर यांच्या घरी भाडयाने वास्तव्य करतात. शुक्रवारी रात्री भोजन केल्यानंतर त्यांनी आयपीएल सामना बघितला आणि नंतर ते गच्चीवर कुटुंबीयांसह झोपण्यास गेले. मात्र त्यांनी घराला कुलूप लावले नव्हते. ही संधी साधून मध्यरात्री चोरटयांनी डाव साधला. चोरटयांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आलमारीचे कुलूप तोडून ३७ हजार रुपये रोख, तसेच चार ग्रॅमची सोन्याची साखळी, पाच ग्रॅमचे रिंग, ३० ग्रॅमची चपलाकंठी, १५ ग्रॅमचे मंगळसूत्र व चांदीचे चाळ असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी आलाम यांच्या घरच्या भोजनावरही यथेच्छ ताव मारुन पलायन केले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आलाम यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. (प्रतिनिधी)