पत्नी गेली माहेरी अन् पतीने घेतला गळफास!
By गेापाल लाजुरकर | Updated: March 6, 2024 20:22 IST2024-03-06T20:22:43+5:302024-03-06T20:22:53+5:30
कौटुंबिक कलह : आंधळी गावातील घटना.

पत्नी गेली माहेरी अन् पतीने घेतला गळफास!
गडचिरोली : कुटुंबात कलह वाढल्याने पत्नी महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली. त्यामुळे वाढलेल्या भांडणतंट्यांमुळे पतीच्या मनातही नैराश्य आले. पत्नी माहेरी निघून गेल्याचे व काैटुंबिक कलहाचे दु:ख सोसवेना झाल्याने पतीने चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार ६ मार्च राेजी सकाळी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे उघडकीस आली.
किरपाल रामजी भोंडे (३१) रा. आंधळी, असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित इसमाचे नाव आहे. भाेंडे यांच्या कुटुंबात सततची भांडणे हाेत हाेती. याच काैटुंबिक कलहामुळे महिनाभरापूर्वी किरपालची पत्नी घर साेडून माहेरी गेली. तेव्हापासून किरपाल हा नैराश्येत हाेता. दरम्यान, बुधवार ६ फेब्रुवारी राेजी सकाळी गावालगतच्या चिचेंच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत किरपाल यांचा मृतदेह आढळून आला. झाडाच्या फांदीवर अडकलेला मृतदेह गावकऱ्यांना दिसताच त्यांनी घटनेची माहिती कुरखेडा पोलिस स्टेशनला दिली. पोलिसानी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. किरपालच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पाेलिसांच्या सखाेल तपासातच सर्व बाबी स्पष्ट हाेतील. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई व भाऊ आहे.