शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली पोलिसांचे शौर्य देशात ‎चमकले; ३१ जणांना राष्ट्रपती पदक

By गेापाल लाजुरकर | Updated: January 25, 2026 22:15 IST

२०१८ मध्ये गाजलेल्या बोरिया-कसनासूर चकमकीतील ऐतिहासिक शौर्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. याशिवाय ३९४ अंमलदारांना पदोन्नतीची बक्षिसीही मिळाली आहे.

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली

‎‎गडचिरोली : माओवाद्यांविरुद्धच्या लढ्यात जिवाची बाजी लावून अतुलनीय धाडस दाखविणाऱ्या जिल्हा पोलिस दलातील ३१ अधिकारी व जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर झाले. २०१८ मध्ये गाजलेल्या बोरिया-कसनासूर चकमकीतील ऐतिहासिक शौर्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. याशिवाय ३९४ अंमलदारांना पदोन्नतीची बक्षिसीही मिळाली आहे.‎‎भामरागड तालुक्यातील बोरिया- कसनासूरच्या घनदाट जंगलात ‎२२ एप्रिल २०१८ रोजी सी-६० पथकाने ऐतिहासिक कामगिरी करत ४० माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. या थरारक मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या जवानांच्या शौर्यावर आता राष्ट्रपतींची मोहोर उमटली आहे. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांनी तब्बल २१७ शौर्य पदके पटकावून देशात आपला दबदबा निर्माण केला आहे. यामुळे जिल्हा पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.‎पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधिरा आणि गोकुल राज जी. यांनी सर्व पदक विजेत्यांचे स्वागत केले आहे.‎‎यांनी पटकावले शौर्यपदक...‎पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, सहायक उपनिरीक्षक विलास पोरतेट, हवालदार संतोष नैताम, विश्वनाथ सडमेक, ज्ञानेश्वर तोरे, दिलीप सडमेक, रामसू नरोटे, आनंदराव उसेंडी, राजू चव्हाण, मोहन उसेंडी, संदीप वसाके, पो. ना. अरुण मेश्राम, सुधाकर वेलादी, नितेश वेलादी, विश्वनाथ मडावी, कैलास कोवासे, हरिदास कुलयेटी, किशोर तलांडे, अतुल मडावी, अनिल आलाम, नरेंद्र मडावी, आकाश ऊईके, घिस्सू आत्राम, राजू पुसाली, महेश जाकेवार, रुपेश कोडापे, मुकेश सडमेक, योगेंद्रराव सडमेक व अंमलदार कारे आत्राम यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले.‎‎शहीद जवानांचा मरणोत्तर गौरव‎कर्तव्य बजावताना बलिदान देणाऱ्या १० शहीद अंमलदारांना प्रशासनाकडून मरणोत्तर पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. यात ७ शहीद हवालदारांना सहायक उपनिरीक्षक, तर ७ शहीद पोलिस नाईक यांना हवालदारपदी बढती देण्यात आली. एकूण ३९४ पदोन्नतींमध्ये १० जणांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी ‘वेगवर्धित’ पदोन्नती देण्यात आली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी