गणेशनच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा

By Admin | Updated: September 15, 2014 00:07 IST2014-09-15T00:07:38+5:302014-09-15T00:07:38+5:30

गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता

Thanks to Ganeshan's duties | गणेशनच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा

गणेशनच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा

गडचिरोली : गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता एम. गणेशन यांनी या पूलाचे काम पूर्ण केले. नक्षलवाद्यांनी त्यानंतर त्यांची हत्या केली. गणेशन यांनी बीआरओच्या मार्फत काम करीत असताना या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली. आज त्यांच्या बलिदानामुळे एटापल्ली तालुक्यातील अनेक गाव कायमस्वरूपी रस्त्याने जोडली गेली. त्यांच्या या कर्तृत्वाला गडचिरोली जिल्ह्यातील जनता कायम सलाम करीत राहिल.
कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय एम. गणेशन यांनी नक्षलवाद्यांच्या या विरोधाला न जुमानता आलदंडी नदीवरील पुलाचे अर्धवट बांधकाम पूर्ण केले. अडंगे व जांभीयागट्टा या दोन पुलाचेही काम त्यांनी त्याचवर्षी पूर्ण केले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांची १४ जानेवारी २००६ ला निर्घृण हत्या केली. २६ जानेवारी २००७ ला गणेशनची पत्नी राखी हिला शौर्य चक्र देऊन राष्ट्रपतींनी सन्मानित केले. गणेशन यांचे बलिदान तालुक्याच्या विकासासाठी झाले. मात्र त्यांच्या शौर्यामुळे व चिकाटीमुळे गट्टा ते एटापल्ली हा ३६ किमीचा मार्ग पूर्ण झाला व दोन गावे कायमस्वरूपी एकमेकांशी जोडल्या गेली. गणेशन यांचे नाव एटापल्ली तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. त्यानंतर २००८-०९ मध्ये जिल्ह्यात निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लोकयात्रेने गणेशन यांच्या कुटुंबाची दखल घेऊन त्यांच्या पत्नीचा यात्रा समारोपप्रसंगी सत्कारही केला होता.
शासनानेसुद्धा आलदंडी पुलाजवळ अभियंता गणेशन यांचे स्मारक बांधून या पुलाला या शहिदाचे नाव द्यावे, अशी भावना या तालुक्यातील जनतेचीही होती. या पूलावरून वाहतूक सुरू होऊन बरेच वर्ष लोटले. बीआरओनेही गडचिरोली जिल्ह्यातून २०१० मध्ये गाशा गुंडाळला. त्यांच्यामुळे नक्षलग्रस्त व संवेदनशील भागात रस्ते व पूल होऊ शकले. त्यानंतर या भागात विकासाचे काम मंदावले. या पूलाला गणेशनचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली होती. परंतु ७ वर्षाचा कालावधी लोटला. सरकारला या गोष्टीचा विसर पडला आहे. १४ जानेवारीला गणेशन यांच्या हत्येला ८ वर्ष पूर्ण झालेत. या पूलामुळे शेकडो गाव जोडल्या गेली. केंद्र सरकारने गणेशनच्या कार्याची दखल घेतली. परंतु महाराष्ट्र शासनाला मात्र त्यांच्या कार्याचा विसर पडला असेच दिसून येत आहे. एकूणच या अभियंत्याचे वीर मरण या जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान देऊन गेले. याशिवाय जिल्ह्यात काम करणाऱ्या अनेक खासगी कंत्राटदार अभियंत्याचीही नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली. त्यांचेही योगदान विकाासाठी मोलाचेच ठरले.

Web Title: Thanks to Ganeshan's duties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.