परीक्षा आली इंग्रजी, भूगोलाचे पुस्तकही उघडले नाही
By Admin | Updated: March 6, 2015 01:25 IST2015-03-06T01:25:33+5:302015-03-06T01:25:33+5:30
१० वीची परीक्षा सध्या सुरू झाली आहे. मात्र जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा येथील पोस्टबेसीक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभरात इंग्रजी, विज्ञान, भूगोल

परीक्षा आली इंग्रजी, भूगोलाचे पुस्तकही उघडले नाही
जिमलगट्टा : १० वीची परीक्षा सध्या सुरू झाली आहे. मात्र जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर असलेल्या देचलीपेठा येथील पोस्टबेसीक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभरात इंग्रजी, विज्ञान, भूगोल या तीन विषयाचे पुस्तकही शिक्षक नसल्याने उघडून पाहिले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
१० वीचे वर्ष हे जीवनातील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाची पायरी समजली जाते. देचलीपेठा येथील पोस्ट बेसीक आश्रमशाळेत संपूर्ण वर्षभर इंग्रजी, भूगोल या दोन विषयाचा अभ्यासक्रम शिकविण्यातच आला नाही. विज्ञान व हिंदीचे प्रत्येकी तीन व चार धडे शिकविण्यात आले. इंग्रजी व विज्ञानाचे पुस्तकही उघडून पाहण्यात आले नाही. पूर्ण वर्षभर एकही तास या विषयांचे झाले नाही. त्यामुळे या दोन विषयाचे पेपर सोडवायचे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मागील वर्षी २०१३-१४ मध्ये इंग्रजी, भूगोल या विषयाचे शिक्षक उपलब्ध होते. त्यांची बदली विभागीय स्तरावरून करण्यात आली व त्यांच्या जागी अजूनपर्यंत दुसरे शिक्षक नियुक्त करण्यात आले नाही. दुर्गम भागात बदली करताना प्रथम बदली शिक्षकाच्या जागी नवीन शिक्षकाची नियुक्ती करून बदली झालेल्या शिक्षकांना सोडायला मूभा देण्याचा प्रघात आहे. परंतु देचलीपेठा आश्रमशाळेतील इंग्रजी व विज्ञान शिक्षकाबाबत असे करण्यात आले नाही. त्यामुळे ८ वी, ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांचे यावर्षी शैक्षणिक नुकसान झाले.
या शाळेत शिक्षकाअभावी काहीच शिकविण्यात आले नाही. त्यामुळे अनेक पालक आत्ताच आपल्या पाल्याची टीसी काढण्याच्या तयारीला लागले आहे. देचलीपेठा आश्रमशाळेत यंदा विद्यार्थी राहण्याची शक्यता कमी आहे. (वार्ताहर)