मुख्याध्यापकाच्या मृत्यूने एटापल्लीत तणाव
By Admin | Updated: February 24, 2017 00:50 IST2017-02-24T00:50:45+5:302017-02-24T00:50:45+5:30
निवडणूक कर्तव्यावर असलेले मुख्याध्यापक नामदेव ओक्टुजी ओंडरे (४०) यांचा मृत्यू झाला.

मुख्याध्यापकाच्या मृत्यूने एटापल्लीत तणाव
एटापल्ली : निवडणूक कर्तव्यावर असलेले मुख्याध्यापक नामदेव ओक्टुजी ओंडरे (४०) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुरूवारी एटापल्ली तालुका मुख्यालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
ओंडरे यांचा मृतदेह घेऊन आलेले वाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे नेत असताना थांबविले. यावेळी वातावरण तंग झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवेदन देण्यात आले. बराच काळ मुख्य रस्त्यावर मृतदेह असलेले वाहन शिक्षक व नागरिकांनी रोखून धरले होते. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना समाजावून सांगत तणाव निवळला. ओंडरे हे एटापल्ली तालुक्याच्या भापडा शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)