गडचिरोलीत होणार टेनिस कोर्ट

By Admin | Updated: December 11, 2014 23:06 IST2014-12-11T23:06:51+5:302014-12-11T23:06:51+5:30

राज्याच्या क्रीडा संचालनालयाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त मैदाने असणे गरजेचे आहे. मोठ्या शहरात आढळून येणारे सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टच्या

Tennis court to be held in Gadchiroli | गडचिरोलीत होणार टेनिस कोर्ट

गडचिरोलीत होणार टेनिस कोर्ट

गडचिरोली : राज्याच्या क्रीडा संचालनालयाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त मैदाने असणे गरजेचे आहे. मोठ्या शहरात आढळून येणारे सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टच्या कामाला जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे येथील आदिवासी विकास विभागाच्या इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळेत २३ लाख रूपयाच्या निधीतून प्रशस्त सिंथेटीक लॉन टेनिस कोर्ट होणार आहे.
टेनिसपटू सानिया मिर्झा यांचे नाव पुढे येताच जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंना टेनिस खेळाची आठवण होते. गडचिरोली जिल्ह्यात टेनिस खेळणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, गडचिरोलीत आजवर सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टची निर्मिती करण्यात आली नाही. आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामॉर्फत आदिवासी नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अनेक कल्याण कारी योजना राबविण्यात येतात. गडचिरोली प्रकल्प कार्यालयाकडे आदिवासी उपयोजनेंतर्गत सद्य:स्थिती २४ लाखाचा निधी उपलब्ध आहे. या निधीतून गडचिरोली येथे सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टचा प्रस्ताव प्रकल्प कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मान्यता दिली आहे. गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्यावतीने या सिंथेटीक लॉन टेनिस कोर्ट निर्मितीकरीता क्रीडा संचालनालयाच्या मार्गदर्शनात कंपनीकडून दरपत्रक मागविण्यात आले आहे. सदर टेनिस कोर्टचे काम सुरू होण्यासाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहे. या टेनिस कोर्टचे काम प्रत्यक्षात २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असल्याचे चिन्ह आहेत. कोर्टमध्ये आदिवासी व इतर विद्यार्थी खेळाडूंना टेनिसचा सराव करता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Tennis court to be held in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.