शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारात दहापटीने वाढ

By admin | Updated: May 15, 2014 23:33 IST

स्वातंत्र्यप्राप्तीपासून देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्यामुळे देशाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे.

देसाईगंज : स्वातंत्र्यप्राप्तीपासून देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्यामुळे देशाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. परंतु विकासाबरोबरच सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न शासनाला योग्यरित्या सोडविता आला नाही. मागील ४0 वर्षात देशाने विकासाबाबत अनेक मैलाचे दगड पार केले. ४0 वर्षात केंद्रात विविध पक्षांचे १३ सरकार सत्तेवर आले. या सरकारने देशात सत्ता घडविली. मात्र एकाही सरकारने महिलांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतले नाही. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरो म्हणजे एनसीआरबीच्या आकडेवारीने या वास्तवावर शिक्कामोर्तब केले आहे. जागतिक महासत्तेकडे आगेकूच करणार्‍या या देशात गेल्या ४0 वर्षात महिलांच्या अत्याचारात मात्र तब्बल दहापटीने वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

गेल्या ६0 वर्षात देशात प्रगतीची असंख्य दालने खुली झाली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात देशाने प्रगती केली. परंतु महिलांच्या सुरक्षिततेबाबत योग्य उपाययोजना करण्यात प्रत्येकच सरकारला अपयश आल्याचे अनेक घटनांवर आपल्या निदर्शनास येते. दरवर्षी महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत असल्याने महिलांना समाजात सुरक्षिततेची हमी आहे काय असा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरवर्षी महिलांच्या अत्याचारात होणार्‍या टक्क्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोच्या अहवालाने अधोरेखीत केले आहे. नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोने देशातील गुन्हेगारीचा १९५३ ते २0१२ पर्यंतचा आढावा घेतला. यात ६0 वर्षात खुनांच्या घटनेत चारपट वाढ झाली. मात्र या अहवालात महिला अत्याचारांच्या घटनांची नोंद १९७१ पासून घेण्यात आली. या अहवालात देशातील महिला ४0 वर्षापूर्वीच्या तुलनेत आजघडीला अधिक असुरक्षित असल्याचे दिसून येते. १९७१ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या २ हजार ४८७ प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. २0१२ मध्ये महिलांवरील अत्याचारांचा आलेख २४ हजार ९२३ पर्यंत गेला आहे. मागील ४0 वर्षात महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह देशात १३ सरकार आली. महिलांना आरक्षणही देण्यात आले. स्त्रियांची संख्या वाढविण्यासाठी ‘बेटी बचाव’ सारखे उपक्रम राबविल्याने २0११ च्या जनगणनेनुसार आज एक हजार पुरूषांमागे ९४0 महिला असा दर वाढला आहे. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेचे आव्हान समाजापुढे ठाकले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही महिलांवर होणार्‍या अत्याचारात वाढ झाली आहे. विकासाबरोबरच गुन्हेगारीचेही प्रमाण वाढल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयीची भीती नाहीशी झाली आहे. त्यामुळे शहरी भागात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास स्त्री रस्त्याने एकटी फिरू शकत नाही, अशी स्थिती शहरी भागात आहे.

शासन महिला सुरक्षेविषयी कितीही कडक कायदे करत असले तरी महिलांवरील होणार्‍या अत्याचारात वाढ होत आहे. परंतु महिलांवरील अत्याचार रोखण्यात शासनाला अपयश आले आहे. महिला सुरक्षिततेचे आव्हान एकाही सरकारला पेलवता आले नाही, असे दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतरही अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतच असल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. (प्रतिनिधी)