सिरोंचातील मंदिरे भाविकांसाठी खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:42 IST2021-08-12T04:42:02+5:302021-08-12T04:42:02+5:30
श्रावण महिन्यात शिवआराधनेला विशेष महत्त्व असते. त्यातल्या त्यात सोमवार हा विशेष महत्त्वाचा दिवस असतो. श्रावण मासारंभापासून महिनाभर प्रत्येक शिवमंदिरात ...

सिरोंचातील मंदिरे भाविकांसाठी खुली
श्रावण महिन्यात शिवआराधनेला विशेष महत्त्व असते. त्यातल्या त्यात सोमवार हा विशेष महत्त्वाचा दिवस असतो. श्रावण मासारंभापासून महिनाभर प्रत्येक शिवमंदिरात भाविकांची अगदी पहाटेपासूनच पूजाअर्चा, आराधना, अभिषेक, जप आदीसाठी ये-जा सुरू असते. कोरोनाचा काळ असल्याने नियमांचे पालन करीत भाविक आपापल्या परीने मंदिरात येतात.
सिरोंचा शहरातील सर्वच शिवमंदिरांत त्या - त्या प्रभागातील भाविक पूजेसाठी येतात. शिवाला बेलपत्र प्रिय असल्याने पूजा व अभिषेकसाठी बेलपत्र वाहतात.
सिरोंचा शहरातील शिवमंदिरे
शहरातील मध्य वस्तीतील श्री सिध्देश्वर हनुमान मंदिर, प्राणहिता नदीकाठावरील विठ्ठल-रखुमाई मंदिर, बसस्थानकाजवळील इंदिरा चौकातील शिवमंदिर व रामांजापूर मार्गावरील श्री कन्यकादेवी मंदिर, आसरअल्ली मार्गावरील श्री वीर ब्रम्हेदरस्वामी मंदिर या सर्व मंदिरांत शिवलिंगाची मनोभावे पूजा करण्यात येते. श्रावण मासानिमित्ताने दर शुक्रवारी सुवासिनी सौभाग्याचे लेणे म्हणून हळद-कुंकवाचा टिळा लावतात. मोड आलेली कडधान्ये (मूग, चणा) एकमेकांना वाटतात. एकंदरीत श्रावण मासारंभापासून महिनाभर भक्तिभावाने व मनोमीलनाने आनंदोत्सव साजरा करतात.
090821\0528img_20210809_170219_1.jpg
श्रावण मासारंभा निमित्ताने शिवाची आराधना ला विशेष महत्त्व!