रात्री १२ पर्यंत खुले राहणार मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:00 IST2018-02-11T23:59:49+5:302018-02-12T00:00:01+5:30

महाशिवरात्रीनिमित्त १३ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत व १५ ते १७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मार्कंडेश्वराचे दर्शन घेता येणार आहे.

The temple will be open till 12 pm | रात्री १२ पर्यंत खुले राहणार मंदिर

रात्री १२ पर्यंत खुले राहणार मंदिर

ठळक मुद्दे१३ पासून जत्रा : मार्कंडेश्वर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : महाशिवरात्रीनिमित्त १३ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत व १५ ते १७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मार्कंडेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. यात्रेदरम्यान भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी नर्सिगदास सारडा यांनी सपत्नीक व सगणापूर-येणापूर इलाखा ग्रामसभेच्या वतीने माजी सरपंच ललीता मरस्कोल्हे व त्यांचे पती सीताराम मरस्कोल्हे यांनी गंगापूजन केले. १३ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता प्रारंभीची महापूजा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासह पुजारी पंकज पांडे त्यांची पत्नी शुभांगी पांडे, खा. अशोक नेते सपत्नीक, आ. डॉ. देवराव होळी सपत्नीक, जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर त्याचे पती मधूकर भांडेकर हस्ते होणार आहे. १५ ला व्याहाड येथील मारोती म्हशाखेत्री यांच्या हस्ते टिपूर पूजा केली जाईल. १७ ला कृउबास सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते अंतिम पूजा होईल. महापूजेनंतर सकाळपासून मंदिर खुले केले जाईल. दर्शन रांगेतील पहिल्या वारकऱ्याचा सत्कार केला जाईल. मार्कंडेश्वर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण दिवस महाप्रसादाची व्यवस्था, पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. अपंग, स्तनदा माता, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तात्पुरते कक्ष उभारले आहे. मंदिराचे काम सुरू असल्याने मुख्य गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यंूजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, तहसीलदार अरूण येरचे, फोकुर्डीचे सरपंच परशुराम तुंबळे उपस्थित होते.

Web Title: The temple will be open till 12 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.