आरमोरी येथे युवकाची निर्घृण हत्या

By Admin | Updated: September 18, 2014 23:35 IST2014-09-18T23:35:16+5:302014-09-18T23:35:16+5:30

आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील जीवानी राईसमिलसमोर अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास युवकाची निर्घृण हत्या केली. विशाल दामोधर भोयर

Teenage murderer at Armori | आरमोरी येथे युवकाची निर्घृण हत्या

आरमोरी येथे युवकाची निर्घृण हत्या

आरमोरी : आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील जीवानी राईसमिलसमोर अज्ञात इसमांनी बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास युवकाची निर्घृण हत्या केली. विशाल दामोधर भोयर (१८) रा. इंदिरानगर बर्डी आरमोरी असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विशाल भोयर हा बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सायकलने घरून निघाला होता. त्यानंतर विशाल ब्रह्मपुरी मार्गावरील राईसमिलजवळ रक्ताच्या थारोळ्यात अर्धनग्न अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला उपचारार्थ आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. परंतू उपचारापूर्वीच विशालचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. मृतक विशालच्या डोका व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याबरोबरच घटनास्थळी मृतकाची सायकल व कपडे बाजूला ठेवलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. याबाबत मृतक विशालचा भाऊ मिथून दामोधर भोयर यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझ्या घराचे अरसोडा येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दीड महिन्यापूर्वी मुलीच्या भावाकडून विशालला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असे विशालच्या भावाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Teenage murderer at Armori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.