८५ केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:49 IST2018-08-09T00:47:22+5:302018-08-09T00:49:33+5:30
केंद्रप्रमुखांना संगणकाद्वारे आॅनलाईन व आॅफलाईन कामे करता आली पाहिजे, तसेच केंद्रातील माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी गटसाधन केंद्र अहेरी व गडचिरोली येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात येथे मंगळवारी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. या दोन्ही कार्यशाळेत एकूण ८५ केंद्रप्रमुख सहभागी झाले होते.

८५ केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/अहेरी : केंद्रप्रमुखांना संगणकाद्वारे आॅनलाईन व आॅफलाईन कामे करता आली पाहिजे, तसेच केंद्रातील माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी गटसाधन केंद्र अहेरी व गडचिरोली येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात येथे मंगळवारी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. या दोन्ही कार्यशाळेत एकूण ८५ केंद्रप्रमुख सहभागी झाले होते.
गडचिरोली येथे झालेल्या प्रशिक्षणात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तीन तालुक्यातील ३५ व अहेरी येथे झालेल्या प्रशिक्षणात मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी या पाच तालुक्यातील ५० केंद्रप्रमुख सहभागी झाले होते.
गडचिरोली येथील प्रशिक्षणात मार्गदर्शक विठ्ठल होंडे यांनी आकांक्षित जिल्हा दर्शक निहाय कृती आराखडा यावर मार्गदर्शन केले. आकांक्षितची आॅनलाईन लिंक किती शाळेनी भरली या विषयी चर्चा करण्यात आली , स्टुडंट पोर्टलवर मास्टर व मेंटेनन्स टॅब वापरून स्टुडंट पोर्टल अपडेट करून महा स्टुडंट अप वापरण्याची पद्धत सांगणे, त्यानंतर ईमेल तयार करून ईमेलद्वारे एक्सल फाईल, फोटो, डॉक्युमेंट सेंड करणे , इत्यादी माहिती देण्यात आली त्यानंतर गुगल फार्म तयार करून लिंक सेंड करणे व माहिती गोळा कशी करायची याची माहिती दिली, तसेच दीक्षा अॅप या विषयी सविस्तर माहिती दिली, तसेच काही तांत्रिक बाबी विषयी माहिती दिली.
अहेरी येथील कार्यशाळेला विषय सहायक विठ्ठल होंडे तसेच गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक ताराचंद भुरसे उपस्थित होते. यावेळी पीपीटीद्वारे मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर कापगते, राजू नागरे, किशोर मेश्राम, सुषमा खराबे, राजेश चक्रमवार यांनी सहकार्य केले.