शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार
By Admin | Updated: November 25, 2014 22:55 IST2014-11-25T22:55:55+5:302014-11-25T22:55:55+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चामोर्शीच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षकांच्या नवीन मागण्यांसंदर्भात पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी व कक्ष अधिकारी वि. रा. कागदेलवार

शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चामोर्शीच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षकांच्या नवीन मागण्यांसंदर्भात पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी व कक्ष अधिकारी वि. रा. कागदेलवार यांची भेट घेऊन नवीन १५ मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी व कक्ष अधिकारी यांनी दिले.
चर्चेदरम्यान यापूर्वीच्या ९० टक्के समस्या निकाली काढण्यात आल्या असल्याचे सांगितले. नवीन मागण्यांमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांचे मानधन व भाजीपाला खर्च त्वरित काढणे, शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे डी. डी. त्वरित पाठविणे, नियमित झालेल्या शिक्षकांना नियमित झाल्याचा आदेश पंचायत समितीस्तरावरून देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. चर्चा करतेवेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष किशोर कोहळे, तालुकाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, सचिव सिद्धार्थ सोरते, शंकर सुरजागडे, अमिश बिश्वास, लोमेश उंदीरवाडे, नानाजी वासेकर, जनार्धन म्हशाखेत्री, पुरूषोत्तम किरमे, लिलाधर वासेकर, गजानन कुनघाडकर, बंडू वनकर, सुनिल सातपुते, वसंत नैताम, मारोती वनकर, ऋषीदेव कुनघाडकर, मनोज बिश्वास, अशोक जुआरे, पुरूषोत्तम गायकवाड, जीवन सिडाम, गुरूदेव सोमनकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.