शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्य

By Admin | Updated: April 5, 2017 01:31 IST2017-04-05T01:31:35+5:302017-04-05T01:31:35+5:30

शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता ज्ञानज्ञानाचे कार्य निरंतर करीत राहावे, शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देऊ यासंदर्भात

Teacher's Problems Prioritize | शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्य

शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्य

जि. प. अध्यक्षांचे आश्वासन : प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार
चामोर्शी : शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता ज्ञानज्ञानाचे कार्य निरंतर करीत राहावे, शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देऊ यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता भांडेकर यांनी केले.
स्थानिक चामोर्शी पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाप्रसंगी जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, पं. स. सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती केशव भांडेकर, संवर्ग विकास अधिकारी गोविंद खमाकर, शिक्षण विस्तार अधिकारी मारोती अलोणे, गौरीपूरचे सरपंच सुनील रॉय, साईनाथ बुरांडे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, मारोती वनकर, मंगलकुमार मानपल्लीवार, सुजीत दास, प्रशांत कोचम, पुरूषोत्तम किरमे, नीलकंठ निकुरे, हेमंत शेंडे, सुरेश पालवे, मारोती कुनघाडकर, किशोर कस्तुरे, अशोक जुआरे, अविनाश भोवरे, रंजना रामगिरवार, सविता उराडे, सुनीता लांबाडे, लोंढे, तुळशिराम शेडमाके, महादेव डे, उमेश कोटनाके, अविनाश बारसागडे, नारायण मल्लीक, मनतोष मंडल, जगदीश मल्लीक, जुमनाके, सुनील सातपुते, चलाख, भैसारे, दुधबावरे, प्रभाकर भोयर, आशिष बिश्वास, पुरूषोत्तम गायकवाड, शंकर सातपुते, सुधाकर दुधबळे, गितेश्वर नैताम, चिचघरे, कुकुडकर, विनोद खोब्रागडे, साईनाथ सोनटक्के आदी उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना भांडेकर म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी ध्येय ठरविले पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन करताना केला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, संचालन संघटनेचे सचिव मारोती वनकर तर आभार बिट प्रमुख सुनील सातपुते यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Teacher's Problems Prioritize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.