शिक्षकांनी कर्तव्यनिष्ठ राहावे
By Admin | Updated: December 23, 2014 23:04 IST2014-12-23T23:04:30+5:302014-12-23T23:04:30+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे विद्या मंदिर आहेत. मुलांना लहान वयात होणारे संस्कार दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे शिक्षकांनी कर्तव्यनिष्ठ राहून विद्यार्थ्यांवर

शिक्षकांनी कर्तव्यनिष्ठ राहावे
वैरागड : जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे विद्या मंदिर आहेत. मुलांना लहान वयात होणारे संस्कार दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे शिक्षकांनी कर्तव्यनिष्ठ राहून विद्यार्थ्यांवर संस्कार करावे, असे प्रतिपादन जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी केले.
मोहझरी केंद्रांतर्गत मेंढेबोडी येथे आयोजित शालेय बालक्रीडा व कला संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती सविता भोयर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, जि. प. सदस्य पूनम गुरनुले, लंकेश भोयर, पं. स. सदस्य रेखा कन्नाके, गटशिक्षणाधिकारी नरोटे, सरपंच शालिकराम मोहुर्ले, पी. एस. कोडापे, प्रमोद तावेडे, रवींद्र बानवे, मारोती गुरनुले, दिवाकर कोसरे, गोरखनाथ भानारकर, जास्वंदा कोटांगले, विश्वनाथ तागडे, विलास खापरे, विजय समर्थ, मुखरू खोब्रागडे, जगदिश पेंदाम, प्रा. प्रदीप बोडणे, मारोती कांबळे, विश्वनाथ तागडे, हिरामण मुंगीकोल्हे, रंजीत गेडाम, विजय गुरनुले उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान ध्वजसंचलन करण्यात आले. या ध्वजसंचलनात केंद्रातील शाळांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यानंतर पाहूण्यांना मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहण करून खेळाडू व पंचांना शपथ देण्यात आली.
जि. प. शाळा वैरागडच्या चमूने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख बी. एस. हेमने, संचालन संजय बिडवाईकर तर आभार व्ही. सी. होंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नारायण गुरनुले, बी. एन. नंदागवळी, सतिश भोसले, के. टी. सहारे, मेघराज बुराडे, दीपक खरकाटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.