शिक्षकांच्या बदल्या रखडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:47 PM2019-03-25T22:47:26+5:302019-03-25T22:47:43+5:30

लोकसभेमुळे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या अडचणीत आल्या आहेत. बदल्यांना तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिली असल्याचे ग्राम विकास विभागाचे परिपत्रक असले तरी यावर्षी बदल्यांची प्रक्रिया रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Teachers change? | शिक्षकांच्या बदल्या रखडणार?

शिक्षकांच्या बदल्या रखडणार?

Next
ठळक मुद्देबदल्यांना स्थगिती : ग्राम विकास विभागाचे परिपत्रक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभेमुळे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या अडचणीत आल्या आहेत. बदल्यांना तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिली असल्याचे ग्राम विकास विभागाचे परिपत्रक असले तरी यावर्षी बदल्यांची प्रक्रिया रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२०१९ मधील बदली प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या होत्या. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॅपींगची प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र १० मार्च रोजी शासनाने लोकसभेची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे मॅपींगची प्रक्रिया थांबली. शिक्षकांच्या बदल्या जूनच्या पूर्वी आटोपणे आवश्यक आहे. मात्र २३ मे पर्यंत लोकसभेची आचारसंहिता आहे. आठ दिवसात मॅपींग करून बदली प्रक्रिया करणे शक्य होणार नाही. त्यामुळे यावर्षीही शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बदली प्रक्रिया न झाल्यास दुर्गम भागातील शिक्षकांसाठी अडचणीचे ठरणार आहे.

Web Title: Teachers change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.