जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:01 IST2017-11-02T00:01:38+5:302017-11-02T00:01:48+5:30
राज्य शासनाच्या अन्यायकारी धोरणाचा विरोध करण्यासाठी जिल्हाभरातील हजारो शिक्षक ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत, ....

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शिक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाच्या अन्यायकारी धोरणाचा विरोध करण्यासाठी जिल्हाभरातील हजारो शिक्षक ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत, अशी माहिती महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी दिली आहे.
निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासाठी संबंधित शिक्षकाची शाळा अ दर्जाची असावी, अशी अट २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये टाकली आहे. सदर अट अतिशय अन्यायकारक आहे. ही अट रद्द करावी. शिक्षकांवर लादलेली आॅनलाईन कामे बंद करून केंद्र पातळीवर डाडा आॅपरेटरची नेमणूक करावी. नोव्हेंबर २००५ नंतर दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. बदल्या करताना कोणावरही अन्याय होऊ नये, याची दखल घ्यावी. एमएससीआयटीसाठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील हजारो शिक्षक सहभागी होणार आहेत, अशी माहिती विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेला महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पी. ए. कावडकर, महाराष्टÑ राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे प्रभाकर साखरे, प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर, सचिव यशवंत शेंडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आशिष धात्रक, राष्टÑवादी शिक्षक संघटनेचे विनोद ब्राह्मणवाडे उपस्थित होते. या आंदोलनाला प्राथमिक शिक्षक समिती, केंद्र प्रमुख संघटना व इतरही शिक्षक संघटनांनी पाठींबा दर्शविला असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.