दुचाकी अपघातात शिक्षक जागीच ठार
By Admin | Updated: July 9, 2017 02:16 IST2017-07-09T02:16:59+5:302017-07-09T02:16:59+5:30
बदली झाल्याने अहेरी पंचायत समितीतून भारमुक्त झाल्याचा आदेशपत्र घेऊन येत असताना दुचाकीला अपघात घडल्याने

दुचाकी अपघातात शिक्षक जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी मो. : बदली झाल्याने अहेरी पंचायत समितीतून भारमुक्त झाल्याचा आदेशपत्र घेऊन येत असताना दुचाकीला अपघात घडल्याने गंभीर जखमी होऊन जि.प. शाळेचा शिक्षक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुनघाडा रै. बस थांबानजीकच्या नाल्याजवळ घडली.
प्रविण जयवंत धाईत (४५) रा. गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. धाईत हे अहेरी पं.स. अंतर्गत लिंगनपल्ली येथील जि.प. प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेत पात्र असलेल्या प्रविण जयवंत धाईत यांची बदली अहेरी पं.सं. मधून गडचिरोली पंचायत समितीमधील बेलगाव जि.प. शाळेत झाली. अहेरी पं.स.मधून भारमुक्तचा आदेशपत्र घेऊन येताना धाईत यांच्या एमएच ३३ आर ३९५५ क्रमांकाच्या दुचाकीला अपघात घडला.