काँग्रेसला बदनाम करणाऱ्यांना धडा शिकवा
By Admin | Updated: June 12, 2016 01:23 IST2016-06-12T01:23:01+5:302016-06-12T01:23:01+5:30
केंद्र व राज्य सरकार काँग्रेसला व काँग्रेसच्या इतिहासालाही बदनाम करीत आहेत, अशा प्रवृत्तीचा कायम नायनाट

काँग्रेसला बदनाम करणाऱ्यांना धडा शिकवा
हरिक्रिष्णा पूजाला यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत युवक काँग्रेसचा मेळावा
गडचिरोली : केंद्र व राज्य सरकार काँग्रेसला व काँग्रेसच्या इतिहासालाही बदनाम करीत आहेत, अशा प्रवृत्तीचा कायम नायनाट करण्यासाठी युवक कार्यकर्त्यांनी कंबर कसावी. काँग्रेसने नेहमीच शेतकरी, शेतमजूर व समाजाच्या सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हरिक्रिष्णा पूजाला यांनी केले.
शुक्रवारी गडचिरोली येथे आयोजित युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेध मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. मारोतराव कोवासे, पंकज गुड्डेवार, हसनअली गिलानी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, काशीनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, सी. बी. आवळे, नरेंद्र भरडकर, प्रभाकर वासेकर, लता पेदापल्ली उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की, देशात प्रचंड भाववाढ झाली आहे. सर्वसामान्य लोक व शेतकरी या भाववाढीने त्रस्त झाले आहेत. भांडवलदार व उद्योगपतींसाठी केंद्र व राज्य सरकार काम करीत असून सर्वसामान्यांच्या योजना बंद करण्याचे कारस्थान सरकारने चालविले आहे, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्याला गौरव अलाम, एनएसयूआयचे नितेश राठोड, तौफिक शेख, जीवन कुत्तरमारे, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, मिलींद बागेसर, बाशिद शेख, कमलेश खोब्रागडे, आरिफ कनोजे, कुणाल पेंदोरकर, पं. स. सदस्य अनिता मडावी, एजाज शेख, नरेंद्र गजपुरे, होमराज हारगुळे, दिगांबर मेश्राम, ठूमदेव कुकूडकार, क्षीरसागर राऊत, रमेश कोंडूके, वृषभ धुर्वे, सुबोध बर्वे, तुषार कुळमेथे, अभिजीत धाईत, प्रशांत इंगोेले, सचिन राठोड, सिद्धांत बांबोळे, अजित खोब्रागडे, चेतन लडके, संतोष फरकाडे, अझर शेख, रोहित सादुलवार, विवेक घोंगळे, सौरभ भांडेकर, कालिदास जेंगठे, रेमाजी खोब्रागडे, राकेश कातकर, महेश मेश्राम, गणेश बारसागडे, मंगेश कोकोडे, नितेश गुरनुले हजर होते. प्रास्ताविक महेंद्र ब्राम्हणवाडे, संचालन अमोल भडांगे तर आभार प्रतीक बारसिंगे यांनी मानले.