४० लाख ११ हजारांचा कर एकाच दिवशी जमा
By Admin | Updated: November 13, 2016 02:10 IST2016-11-13T02:10:46+5:302016-11-13T02:10:46+5:30
शुक्रवारी जिल्ह्यातील दोन नगरपालिका व १० नगर पंचायतीत ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारून कर भरण्याची

४० लाख ११ हजारांचा कर एकाच दिवशी जमा
१४ पर्यंत कर वसुली सुरू राहणार
गडचिरोली : शुक्रवारी जिल्ह्यातील दोन नगरपालिका व १० नगर पंचायतीत ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ४०.११ लाख रूपयांचा कर वसूल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
गडचिरोली येथे रात्री ११ वाजेपर्यंत १२ लाख ८७ हजार ८०५, देसाईगंज येथे ९ लाख ८८ हजार २४३ रूपये जमा झाले. आरमोरी ५ लाख १५ हजार ४१२, कोरची १ लाख ४५ हजार ५९४, कुरखेडा १ लाख ३१ हजार २७, चामोर्शी ७ लाख ४८ हजार ५००, सिरोंचा ८० हजार ६१८, अहेरी २ लाख ७३ हजार १०४, मुलचेरा ३३ हजार २००, एटापल्ली ५३ हजार ५८७, धानोरा २२ हजार ७५८, भामरागड ७ हजार ८३० रूपये कर जमा करण्यात आला. सुरूवातीला राज्य सरकारने एकच दिवस कर भरण्यासाठी जुने चलन चालेल, असे जाहीर केले होते. मात्र आता १४ नोव्हेंबरपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्याजवळील जुन्या नोटांच्या आधारे कर भरणे शक्य होणार आहे.
विजेचे बिल भरण्यासाठी चालणार जुन्या नोटा
महावितरण १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीज बिलाच्या स्वरूपात ५०० व १००० च्या नोटा स्विकारणार आहेत. १३ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजतापर्यंत तर १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विविध वीज बिल संकलन केंद्रांवर या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत, अशी माहिती चंद्रपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर तसेच गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वीज बिल भरणा केंद्र आहेत.