शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेसच्या तिकिटासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:49 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू होताच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षात तिकिटासाठी कोणतीही स्पर्धा नसली तरी काँग्रेसमध्ये मात्र रस्सीखेच सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनेत्यांना लागले लोकसभेचे वेध : वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वावर ठरणार उमेदवारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू होताच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षात तिकिटासाठी कोणतीही स्पर्धा नसली तरी काँग्रेसमध्ये मात्र रस्सीखेच सुरू झाली आहे. यावेळी आपल्यासाठी वातावरण अनुकूल राहील असा विचार करून काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी फिल्डींग लावणे सुरू केले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी होऊन पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचलेले भाजपचे खासदार अशोक नेते यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाच्या बहुतांश भागात जनसंपर्क ठेवून आपली पकड घट्ट केली आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया अशा तीन जिल्ह्यात पसरलेल्या या मतदार संघाचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र पाहता सर्व भागात जनसंपर्क ठेवणे एक आव्हान असले तरी नेते हे आव्हान पेलण्यात बºयाच प्रमाणात यशस्वी झाले. त्यामुळेच आज भाजपमध्ये त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय अजूनतरी समोर आलेला नाही. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नावाचीही अधूनमधून चर्चा सुरू असते. पण विजयाच्या निकषावर ते कितपत खरे उतरतील याबाबत भाजपकडूनच शंका उपस्थित केली जात असल्याने त्यांच्या नावाची चर्चा निव्वळ वावड्या ठरत आहे.दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र दिवसागणिक चुरस वाढत आहे. गेल्यावेळी मोदी लाट होती, पण यावेळी मात्र सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला विजयाची संधी असल्याचे गृहित धरून इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यात प्रामुख्याने माजी आमदार तथा काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान आणि युवा नेते म्हणून डॉ.नितीन कोडवते यांचे नाव समोर केले जात आहे. परंतू उमेदवार निवडताना त्याचे वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गोष्टी महत्वाच्या ठरणार आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरताना या तीन गोष्टींवरच उमेदवार तग धरू शकणार आहे. त्यामुळे या तीन निकषांचा विचार केल्यास अनुभवहीन युवा नेतृत्व भाजपच्या मुरब्बी नेत्यांसमोर तग धरू शकेल का? अशी शंका काँग्रेसच्या एका गटाकडून व्यक्त केली जात आहे.पक्षाने आदेश दिल्यास स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी ठेवणाºया माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी काही दिवसांपूर्वीच साजऱ्या झालेल्या जल्लोषपूर्ण वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अजून निवृत्त झालेलो नाही हे दाखवून दिले. तरीही चिरंजीव विश्वजित यांच्या राजकीय भवितव्याच्या हमीवर स्वत: माघार घेऊन डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नावाला ते पाठींबा देऊ शकतात. सुरूवातीला विधानसभेसाठी जास्त इच्छुक असणाऱ्या डॉ.उसेंडी यांनी अलिकडे लोकसभेची ‘रिस्क’ घेणे फायद्याचे समजत तयारी सुरू केली आहे. तिकडे गोंदिया जिल्ह्यातील डॉ.नामदेव किरसान या माजी उत्पादन शुल्क आयुक्तांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होऊन पक्षबांधणीच्या कामात हातभार लावला आहे. त्यामुळे गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी आपणच योग्य पर्याय असल्याचे त्यांनीही पक्षश्रेष्ठींपुढे बिंबवले आहे.वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या निकषावर हे सर्व नेते सरस असले तरी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाने युवा नेते म्हणून डॉ.नितीन कोडवते यांना पुढे करत कामी लागण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ.कोडवते यांनी लोकसभा क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जनसंपर्क सुरू केला आहे.आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांना आहे. मात्र तिकीट आपल्यालाच मिळेल का, याबाबत डॉ.कोडवते स्वत:च साशंकता व्यक्त करीत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस