तंत्रनिकेतनचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:22+5:302021-07-22T04:23:22+5:30
मेळावाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. अतुल बोराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समशेरखान ...

तंत्रनिकेतनचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
मेळावाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. अतुल बोराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समशेरखान पठाण, सचिव विनायक धानोरकर, संस्थेचे समन्यवक प्र. सो. चलाख उपस्थित होते.
मागील ५ ते ६ वर्षांत तंत्रशिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकाेन बदलला आहे. संस्थेतील यशस्वी विद्यार्थी, यशाची वाटचाल करीत असून, नामांकित कंपन्यांमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. तर काही विदेशी कंपन्यांसुध्दा आहेत, एवढेच नव्हे तर शासकीय सेवेतही काम करीत असून, काहीजण यशस्वी उद्योजक आहेत. संस्थेचा इतिहास विचारात घेता जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी तंत्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य अतुल बाेराडे यांनी केले. संचालन प्रा. दि. व. अळसपुरे व आभार सहसमन्वयक प्रा. मि. वि. लांडे यांनी मानले.