तलाठी व मंडळ अधिकारी रजेवर

By Admin | Updated: November 17, 2016 02:12 IST2016-11-17T02:12:05+5:302016-11-17T02:12:05+5:30

तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या,

Talathi and board officer on leave | तलाठी व मंडळ अधिकारी रजेवर

तलाठी व मंडळ अधिकारी रजेवर

तहसीलदारांना निवेदन : पुढील निर्देशापर्यंत कार्यवाही
भामरागड : तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी/पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या निर्देशानुसार भामरागड तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबरपासून संघटनेच्या पुढील निर्देशापर्यंत सामूहिक रजेवर जात असल्याचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.
तलाठी/मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने २६ आॅक्टोबरला आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यानुसार भामरागड तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलनाची कार्यवाही पार पाडली. १६ नोव्हेंबरला सामूहिक रजेवर जात असल्याचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. तालुक्यातील भामरागडचे तहसीलदार एल. ए. खरकाटे, धोडराजचे एच. एम. शेख, आरेवाडाचे आर. एस. कलगटवार, लाहेरीच्या तलाठी आर. एस. करंबे, कियरचे तलाठी आर. डी. गड्डम, येचली व मन्नेराजारामचे तलाठी मगरे, चिचोडा व कुडकेलीचे के. डी. चालुरकर, ताडगावचे एस. एस. रायसिडाम, भामरागड तहसील कार्यालयातील अव्वल कारकून व्ही. टी. खेवले, व्ही. टी. खेवले आदी कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Talathi and board officer on leave