डॉक्टरवर हात उगारणाऱ्यावर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST2021-05-15T04:35:00+5:302021-05-15T04:35:00+5:30

याबाबत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीदेखील २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवाराचे अपहरण प्रकरणात ...

Take stern action against the doctor | डॉक्टरवर हात उगारणाऱ्यावर कठोर कारवाई करा

डॉक्टरवर हात उगारणाऱ्यावर कठोर कारवाई करा

याबाबत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीदेखील २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवाराचे अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असून सध्या जमानतीवर बाहेर असल्याचे समजते. या आमदापुत्राच्या हातून गुन्हे घडत असतात, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे त्याच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीना असा संशय व्यक्त होत आहे. ढिवर- भोई समाज अतिशय मागासलेला समाज असून या समाजातील बोटावर मोजण्याइतके लोक या मोठ्या पदावर विराजमान होतात. परतु त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ढिवर- भोई समाजातील कुठल्याही व्यक्तीवर अशाप्रकारचे अत्याचार सहन केले जाणार नाहीत. त्यामुळे आमदारपुत्रावर विविध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी जेणे करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, अशी मागणी केली आहे. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. निवेदन देतेवेळी ढिवर- भोई समाजाचे सीताराम गेडाम, देवानंद दुमाने, बाबुराव शेंडे, शंकर नागपुरे, योगेश कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Take stern action against the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.