त्या वाघाला पकडण्यासाठी उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:43 IST2021-09-14T04:43:28+5:302021-09-14T04:43:28+5:30
खासदार अशोक नेते यांनी साेमवारी जेप्रा येथे जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश ...

त्या वाघाला पकडण्यासाठी उपाययोजना करा
खासदार अशोक नेते यांनी साेमवारी जेप्रा येथे जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश दिले. तसेच गणपत भांडेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, मनोहर झंझाड, जेप्राच्या सरपंच शशिकला मनोहर झंझाड, उपसरपंच कुंदा राजेंद्र लोनबले, भाजपचे कार्यकर्ते देवानंद चलाख व गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांनी सांगितले की वाघाच्या भीतीमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. शेताकडे जाणेही कठीण झाले आहे. वाघ शेताकडे येत असून गाय, बकऱ्यांना सोडून तो मानवावर हल्ला करीत आहे. वाघाला मानवाच्या रक्ताची चव लागलेली असून तो नरभक्षक वाघ झालेला आहे त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली.
दि. ११सप्टेंबर रोजी वाघाने हल्ला करून जेप्रा येथील गणपत मंगरू भांडेकर या शेतकऱ्यांला ठार केले होेते.