शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

परराज्यातील धान आढळून आल्यास कायदेशिर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 5:00 AM

बुधवारी ना.पवार यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह पोलीस महानिरीक्षक आणि विभागीय आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्स करून आढावा घेतला. राज्य शासनाने जाहीर केलेला बोनस तसेच दर याचा लाभ घेण्यासाठी शेजारच्या राज्यातून गैरमार्गाने आलेला धान जिल्ह्यातील आधारभूत खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आपल्या राज्यातील वाढीव दर व बोनसचा फायदा हा स्थानिक शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे.

ठळक मुद्देउपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना सूचना

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने दिलेला बोनस आणि वाढीव दर लाटण्यासाठी परराज्यातील धान गैरमार्गाने गडचिरोली जिल्ह्यात आणून शासकीय धान खरेदी केंद्रावर विकण्याचा प्रयत्न होत आहे. तसे आढळल्यास त्यांच्याविरूद्ध गुन्हे नोंद करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.बुधवारी ना.पवार यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह पोलीस महानिरीक्षक आणि विभागीय आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्स करून आढावा घेतला. राज्य शासनाने जाहीर केलेला बोनस तसेच दर याचा लाभ घेण्यासाठी शेजारच्या राज्यातून गैरमार्गाने आलेला धान जिल्ह्यातील आधारभूत खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आपल्या राज्यातील वाढीव दर व बोनसचा फायदा हा स्थानिक शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. गैरमार्गाने येणाऱ्या धानावर तातडीने निर्बंध घालण्यासाठी प्रक्रिया राबवा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यात याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच यापुढे असा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्ती व वाहनांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आंतरराज्यीय सीमांवर चेक पोस्ट लावणे, वाहनांची तपासणी करणे याकरीता लेखी आदेशही देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासकीय धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनाच बोनस दिला जाणार आहे. शेजारच्या राज्यातून येणाऱ्या धानास कोणत्याही प्रकारे खरेदी करू नये अशा सूचना प्रशासनाकडून लेखी स्वरूपात देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यांच्या सीमांवर उभारणार चेकपोस्टजिल्हयात बाहेर राज्यातून व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या धानावर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी चेकपोस्ट उभारले जाणार आहेत. पोलीस, आरटीओ तसेच महसूल विभाग अशा वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकांवर गुन्हे दाखल करणार आहे. इतर राज्यातून गैरमार्गाने धान वाहतूक करून जिल्ह्यात विक्री करण्यास बंदी आहे. याबाबत स्थानिक शेतकरी यांनी आपले सातबारा तसेच बँकेचे तपशील अशा गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींना देवू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजीधान उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरीक्त व्यापारी किंवा इतर कोणत्याही इसमाने संबंधित केंद्रावर धान विक्री करण्यासाठी आणल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता नेताना सोबत आधारकार्ड व चालू असलेल्या बँकेच्या बचत खात्याचे पासबुक व ज्यावर धानपिकाची नोंद आहे असा चालू वर्षाचा सातबारा उतारा आणणे अनिवार्य राहील.  धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खासगी व्यापारी, दलाल, मध्यस्थांची मदत  न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी. तथापी, धान उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजार दराने धानाची विक्री केली असल्यास त्यांना चालू वर्षाचा नमुना सातबारा आणि बँक खात्यांचा तपशील देणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंगला यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी