विद्यार्थिनीवरील कारवाई मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:48 IST2017-01-17T00:48:25+5:302017-01-17T00:48:25+5:30
येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात चार वर्षापासून राहून समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ...

विद्यार्थिनीवरील कारवाई मागे घ्या
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बीआरएसपीची मागणी
गडचिरोली : येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात चार वर्षापासून राहून समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या देवयत्री टोहलिया या विद्यार्थिनीवर नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी तिच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक आहे. सदर कारवाई तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी सोनवाने यांनी निवेदन स्वीकारले
चालू शैक्षणिक सत्रातसुद्धा देवयत्रीला आदिवासी विभागाच्या वसतिगृहात नियमानुसार प्रवेश देण्यात आला. तिने कोणतेही बेकायदेशीर काम केले नाही, अथवा सहभागी नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात इतर सुविधांच्या मागणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटायला गेलेल्या गटाची ती एक भाग होती. कायद्याच्या अधीन राहून सोयीसुविधांची मागणी करण्यात आली. परंतु तिच्यावर पोलीस कारवाई अंतर्गत कलम १४४ अन्वये आदेश काढण्यात आला. यानुसार तिला शाळा, कॉलेज वसतिगृहामध्ये प्रवेश करण्यास व थांबण्यास मनाई करण्यात आली. व याचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. ही कारवाई अन्यायकारक आहे, असे बीआरएसपीने म्हटले आहे.