विकासासाठी योजनांचा लाभ घ्या
By Admin | Updated: December 14, 2015 01:38 IST2015-12-14T01:38:18+5:302015-12-14T01:38:18+5:30
दुर्गम भागात विकासाचा अभाव यासह विविध समस्या आहेत. व्यसनाधिनता, सामाजिक व वैयक्तिक जीवनातील अडसर यासह नक्षल समस्याही आहे.

विकासासाठी योजनांचा लाभ घ्या
क्रीडा स्पर्धा व जनजागरण मेळावा : धानोरात अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
धानोरा : दुर्गम भागात विकासाचा अभाव यासह विविध समस्या आहेत. व्यसनाधिनता, सामाजिक व वैयक्तिक जीवनातील अडसर यासह नक्षल समस्याही आहे. परिणामी या भागातील विकास खुंटत आहे. वैयक्तिक, सामाजिक, गाव विकासासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानोरा येथे गुरूवारी आयोजित जनजागरण मेळाव्यात केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांसाठी धानोरा येथे ८ ते १० डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी शेवटच्या दिवशी जनजागरण मेळावा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याला डेप्युटी कमांडंट सपन सुमन, प्रदीप राणा, असिस्टंट कमांडंट स्वतंत्रकुमार, डॉ. परेश गाटेपागर, सहायक उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी एस. पी. फासे, संवर्ग विकास अधिकारी कोल्हे, तहसीलदार मडावी, नायब तहसीलदार इंदूरकर, ठाणेदार महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके उपस्थित होते. ८ ते ९ डिसेंबर दरम्यान क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी, खेळाचे साहित्य व रोख बक्षीस देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)