शिक्षकाच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 01:51 IST2017-02-26T01:51:33+5:302017-02-26T01:51:33+5:30
निवडणूक कामाच्या कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झालेले शिक्षक नामदेव ओंडरे यांच्या

शिक्षकाच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
एसडीओंना निवेदन : मराठी शिक्षक परिषदेची मागणी
एटापल्ली : निवडणूक कामाच्या कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झालेले शिक्षक नामदेव ओंडरे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व शिक्षकाच्या वारसाला तत्काळ सेवेत सामावून कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आले.
नामदेव ओंडरे हे आपली तब्येत बरी नसल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अर्जासह सादर करण्याकरिता गेले असता, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांची विनंती न स्वीकारता त्यांना कर्तव्यावर पायी पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांना वाटेत मध्यंतरी छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यांनी सदर बाब पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितली. परंतु त्यांना वेळीच उपचार मिळाला नाही. पायी चालविण्यात व रेफर करण्यातच वेळ निघून गेला. मला पायी चालणे शक्य नाही, अशी विनंती ओंडरे यांनी केली असतांनाही पुन्हा त्यांना पायी चालविण्यात आले. मध्यंतरी रस्त्यावर ते चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांना अहेरी येथे रेफर केले व तेथून चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विनोद करमरकर, भिवाजी कुळयेटी, नीलकंठ ओंडरे, सूरज दोंतुलवार यांनी केली आहे.