भामरागडातील पोलीस हवालदारावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 01:44 IST2016-03-30T01:44:03+5:302016-03-30T01:44:03+5:30

तालुक्यातील धोडराज येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात २९ डिसेंबर २०१५ रोजी आम्ही महिलांनी भामरागडात मोर्चा काढला.

Take action on the police constable of Bhamragad | भामरागडातील पोलीस हवालदारावर कारवाई करा

भामरागडातील पोलीस हवालदारावर कारवाई करा


एसडीओंना निवेदन : महिला एकवटल्या

गडचिरोली : तालुक्यातील धोडराज येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात २९ डिसेंबर २०१५ रोजी आम्ही महिलांनी भामरागडात मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान भामरागडचे पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी आम्हा महिलांना अपशब्द बोलून धमकी दिली. सदर प्रकार गंभीर असल्याने पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अथवा त्यांची भामरागड येथून इतरत्र बदली करावी, अशी मागणी भामरागड येथील महिलांनी उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली.
निवेदनात महिलांनी म्हटले आहे की, स्त्री अत्याचाराच्या विरोधात महिलांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. मात्र बलात्कार ही छोटीशी घटना आहे. मोर्चा कशाला काढला, अशी उलट विचारणा पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी महिलांना केली. मंथनवार यांच्या वागणुकीमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे महिलाविरोधी भूमिका घेणाऱ्या मंथनवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. मात्र कारवाई झाली नाही. येत्या १५ दिवसांत मंथनवार यांच्यावर कारवाई न झाल्यास १६ व्या दिवसापासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून एसडीओंना दिला आहे. निवेदन देताना रमा टेंभूर्णे, वसंती मडावी, अर्पणा सडमेक, भारती इष्टाम, सविता दास आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Take action on the police constable of Bhamragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.