बियाणे विकणाऱ्या कृषी सहायकावर कारवाई करा

By Admin | Updated: September 21, 2015 01:28 IST2015-09-21T01:28:48+5:302015-09-21T01:28:48+5:30

शेतकऱ्यांसाठी आलेले बियाणे खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या कृषी सहायक कोहाळकर यांच्यावर कारवाई करावी,..

Take action on agricultural assistance by selling seeds | बियाणे विकणाऱ्या कृषी सहायकावर कारवाई करा

बियाणे विकणाऱ्या कृषी सहायकावर कारवाई करा

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
देसाईगंज : शेतकऱ्यांसाठी आलेले बियाणे खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या कृषी सहायक कोहाळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव, चोप, डोंगरमेंढा येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कृषी सहायक कोहाळकर यांनी कोरेगाव येथील नागरिक शामराव म्हस्के यांना हाताशी धरून खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आलेले बियाणे दामदुपटीने शेतकऱ्यांना विकले. शेतकऱ्यांनी याबाबत विचारणा केली असता, कोहाळकर यांनी शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यानाच उडावाउडवीचे उत्तरे दिली व एकही कीटकनाशक व बियाणे शेतकऱ्यांना दिले नाही. संपूर्ण मालाचा साठा शामराव म्हस्के यांच्या घरी ठेवण्यात आला होता. शामराव म्हस्के हे गावात कृषीमित्र असल्याचे सांगून अनुदानित बियाणे आपल्याच मर्जीने वाटप करण्याचे आदेश कृषी सहायक कोहाळकर यांनी दिले असल्याचे सांगितले. शामराव म्हस्के यांनी स्वत:च लिहिलेला अहवाल कोहाळकर यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्या कोहाळकर यांना निलंबित करून अटक करावी. त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचा अपहार केल्याप्रकरणी शामराव म्हस्के यांच्यावरसुध्दा फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी अनिल म्हस्के, रवींद्र नाकाडे, धनंजय दोनाडकर, जयंत भारती, पुरूषोत्तम भागडकर, रामदास दोनाडकर, विलास म्हस्के, लोमेश्वर म्हस्के, कृष्णा दोनाडकर, फाल्गुन नाकाडे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, खासदार, कृषीमंत्री, पालकमंत्री, पोलीस स्टेशन देसाईगंज यांच्याकडे निवेदन दिले आहे. कोहाळकर यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Take action on agricultural assistance by selling seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.