मला त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा

By Admin | Updated: February 24, 2016 01:19 IST2016-02-24T01:19:44+5:302016-02-24T01:19:44+5:30

आपण कायद्यानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अमिर्झा गावाच्या पोलीस पाटलाची जबाबदारी पार पाडीत आहो.

Take action against those who harass me | मला त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा

मला त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा

उपोषण करणार : सोनाली वरगंटीवार यांची मागणी
गडचिरोली : आपण कायद्यानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अमिर्झा गावाच्या पोलीस पाटलाची जबाबदारी पार पाडीत आहो. मात्र गेल्या काही दिवसापासून अमिर्झा येथील रवींद्र वरगंटीवार, पुरूषोत्तम गेडाम व भास्कर नागापुरे हे तिघेजण गावकऱ्यांना भडकावून मला त्रास देत आहेत. माझ्या पोलीस पाटील पदावरून हटविण्याची मागणी करीत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित तिन्ही दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, असा इशारा सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमिर्झाच्या पोलीस पाटील सोनाली वरगंटीवार यांनी केली.
अमिर्झा गावात विना परवानगीने सुरू करण्यात आलेली आॅनलाईन लॉटरीचा व्यवसाय आपण पुढाकार घेऊन बंद केला. तेव्हापासून वरील तीन व्यक्ती माझ्यावर बिनबुडाचे खोटे आरोप करीत आहेत. गावात कायदा, शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करून मला न्याय देण्यात यावा, अशी मागणी करीत यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी, एसपींची भेट घेणार आहोता, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Take action against those who harass me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.