पीओपीच्या मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:47+5:302021-09-05T04:41:47+5:30
चामाेर्शी तालुका मुख्यालयी कुंभार समाजाच्या लोकांची संख्या बरीच आहे. येथील कुमार समाज बांधव पारंपरिक पद्धतीने मातीपासून विविध कलाकुसरीच्या व ...

पीओपीच्या मूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा
चामाेर्शी तालुका मुख्यालयी कुंभार समाजाच्या लोकांची संख्या बरीच आहे. येथील कुमार समाज बांधव पारंपरिक पद्धतीने मातीपासून विविध कलाकुसरीच्या व संसार उपयोगी वस्तू तयार करून व विक्रीतून उपजीविका करतात. याशिवाय देवी-देवतांच्या मूर्ती तयार करतात. मात्र आता पीओपी मूर्ती बनविली जात असल्याने मातीच्या मूर्ती बनविणाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाने आवाज उठविला आहे. त्यामुळे पीओपी मूर्तीवर कायम बंदी घालावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना वासुदेव वरवाडे, पंढरीनाथ कपाट, मनोहर कोटांगले, दादाजी पातर, देवाची ठाकूर, गीतेश्वर कोटांगले, विनायक कपाट, महादेव कोटांगले, सूरज वरवाडे, निखिल कपाट, साईनाथ कोटांगले, कृष्णा कपाट आदी समाजबांधव उपस्थित होते. यासंदर्भात तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
040921\img-20210902-wa0089.jpg
पीओपी मूर्ती वर बंदी घाला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना चे फोटो