निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: March 6, 2017 00:43 IST2017-03-06T00:43:25+5:302017-03-06T00:43:25+5:30
मुख्याध्यापकाची प्रकृती ठीक नसतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने निवडणुकीच्या कामावर पाठविले.

निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मुख्याध्यापक मृत्यू प्रकरण : शिक्षक परिषदेची मागणी
चामोर्शी : मुख्याध्यापकाची प्रकृती ठीक नसतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने निवडणुकीच्या कामावर पाठविले. यामध्ये मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचबरोबर शासनाने मृतकाच्या वारसास आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली जिल्हा शाखेने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भापडा येथील खासगी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले नामदेव ओंडरे यांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचे कारण सांगितले असतानाही ओंडरे यांना निवडणूक कर्तव्यावर नेमण्यात आले व त्यांचा मृत्यू झाला. यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी संतोष सुरावार, गोपाल मुनघाटे, मनोज बोमणवार, रोहणकर रसे, बोरीकर, तालापल्लीवार यांच्यासह महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे इतर सदस्य उपस्थित होते.