बाेगस सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:35 IST2021-04-15T04:35:21+5:302021-04-15T04:35:21+5:30

सदर रस्ता कामाची तक्रार आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आ. डॉ. होळी यांनी तक्रारीची दखल घेतली व ...

Take action against the contractor constructing the bagasse cement concrete road | बाेगस सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा

बाेगस सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा

सदर रस्ता कामाची तक्रार आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आ. डॉ. होळी यांनी तक्रारीची दखल घेतली व प्रत्यक्ष या रस्ता बांधकामाची पाहणी केली. १३ एप्रिल रोजी नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत सन २०२० मध्ये बांधकाम करण्यात आलेले सी.सी. रोड बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यापैकी प्रभाग क्र. १३ चे साधूबाबा कुटीजवळील मधुकर गौरकार ते विनोद गुडलावार यांच्या घरापर्यंतचे सीसी रोड व नाली बांधकाम आहे. ८ ते १० महिन्यातच या रोडला भेगा पडल्या व साइडला लावलेले गट्टु खाली दबले आहे. बुधवारी या रस्त्याची तक्रार आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर डॉ. होळी यांनी या रस्ता बांधकामाची पाहणी केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, युवा मोर्चाचे प्रतीक राठी, संजय लोणारे , शिक्षक राजू धोडरे उपस्थित होते.

Web Title: Take action against the contractor constructing the bagasse cement concrete road