शहरं
Join us  
Trending Stories
1
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
2
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
3
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
4
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
5
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
6
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
7
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
8
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
9
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
10
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
11
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
12
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
13
UTS वर लोकलचा पास काढणं झालं बंद! तुमच्याकडे असलेल्या जुन्या पासचं काय होणार? वाचा सविस्तर...
14
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
15
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
16
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
17
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
18
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
19
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
20
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वीटी बनली विक्रीकर आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:47 IST

आरमोरी शहरात वास्तव्यास असलेली स्वीटी यादव लोणारे हिने सन २०१७ च्या महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. स्विटीची सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी शहराचा नाव लौकीक झाला आहे. आरमोरी शहरातून मोठी अधिकारी बनणारी स्वीटी ही पहिलीच मुलगी आहे.

ठळक मुद्देआरमोरी शहराचा नावलौकिक वाढविला : एमपीएससी परीक्षेत मिळविले यश

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरात वास्तव्यास असलेली स्वीटी यादव लोणारे हिने सन २०१७ च्या महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. स्विटीची सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाने गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी शहराचा नाव लौकीक झाला आहे. आरमोरी शहरातून मोठी अधिकारी बनणारी स्वीटी ही पहिलीच मुलगी आहे.स्वीटी लोणारे हिचे वडील यादव लोणारे हे आरमोरी तालुक्याच्या वडधा येथील किसान विद्यालयात सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे. तर आई गृहिणी आहे. स्वीटीचा भाऊ अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. स्वीटीने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण आरमोरी येथील डॉ. आंबेडकर विद्यालयातून पूर्ण केले. इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिसरी आली होती. त्यानंतर तिने इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयातून पूर्ण केले. इयत्ता बारावीत बोर्डाच्या परीक्षेत ब्रह्मपुरी तालुक्यातून प्रथम आली होती. दहावी व बारावीमध्ये गुणवत्तेत प्रथम आल्याने सत्कार समारंभामध्ये तिला स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे स्वीटीने बीटेकचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू केला. मोठी अधिकारी बनायची इच्छा असल्याचे स्वीटीने आपल्या आई-वडिलाला सांगितले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या दिशेने ती वळली. अहोरात्र परीश्रम करून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २०१६ मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुरूवातीला तिची आरएफओ म्हणून निवड झाली. यासोबतच तिने २०१७ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली. ३० मे रोजी लागलेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात तिने यश मिळविले. तिची सहायक विक्रीकर आयुक्त वर्ग १ या पदावर नियुक्ती झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने हे यश आपण मिळवू शकले, असे स्विटी म्हणाली.