शेतशिवारात वृध्द महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST2021-07-07T04:45:45+5:302021-07-07T04:45:45+5:30

नाकातून रक्तस्राव झाल्याने मृतदेहाचा चेहरा रक्ताने माखलेला होता. मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे चिन्ह शरीरावर वरकरणी दिसत नव्हते. त्यामुळे ...

Suspicious death of an elderly woman on a farm | शेतशिवारात वृध्द महिलेचा संशयास्पद मृत्यू

शेतशिवारात वृध्द महिलेचा संशयास्पद मृत्यू

नाकातून रक्तस्राव झाल्याने मृतदेहाचा चेहरा रक्ताने माखलेला होता. मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे चिन्ह शरीरावर वरकरणी दिसत नव्हते. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

शीलाबाई रविवारी दुपारच्या सुमारास वाकडी मार्गावर असलेल्या स्व:च्या शेतात तूर पेरणीसाठी गेल्या होत्या. रात्र होऊनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. रात्री शेतात शोध घेतला तेथेही त्या दिसून आल्या नाही, सकाळी पुन्हा शोध सुरू केला तेव्हा शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुधाकर देठे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला. शीलाबाई यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व इतर सदस्य असा परिवार आहे.

050721\img-20210705-wa0080.jpg~050721\img_20210705_132059.jpg

मृतक महिलेला नेताना~मृतक शिलाबाई कूंडलीक कसारे

Web Title: Suspicious death of an elderly woman on a farm