शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास प्रस्तावाला स्थगिती

By admin | Updated: June 11, 2015 01:46 IST

चामोर्शी पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे उपसभापती केशव मसाजी भांडेकर यांच्या विरूद्ध रेवनाथ कुसराम व इतर नऊ ....

चामोर्शी पं. स. मध्ये झाली बैठक : १२ सदस्यांचे हात उंचावून मतदान
चामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे उपसभापती केशव मसाजी भांडेकर यांच्या विरूद्ध रेवनाथ कुसराम व इतर नऊ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर बुधवारी विशेष सभेत मतदान घेण्यात आले. १६ पैकी १३ सदस्य या सभेला हजर होते. अविश्वास ठरावाच्या बाजुने १२ तर अविश्वासाच्या विरूद्ध बाजुन एका सदस्याने हात उंचावून मतदान केले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ९ जून रोजी हमदस्त प्राप्त झाल्यामुळे या अविश्वास ठरावाचा निकाल न्यायालयाच्या निर्देशानुसार राखून ठेवण्यात आला आहे.
२५ मे २०१५ रोजी पं. स. सदस्य रेवनाथ कुसराम व इतर नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार बुधवारी विशेष सभा दुपारी १ वाजता घेण्यात आली. १६ पैकी १३ सदस्य या विशेष सभेला हजर होते. यावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने रेवनाथ कुसराम, मनमोहन बंडावार, रंजना कुमरे, मनीषा दुधबावरे, मिनाक्षी देवगडे, प्रमोद भगत, किरण कोवासे, कल्पना कोडापे, नुमचंद भिवनकर, सुरेंद्र सोमनकर, रूपाली निखाडे, सावित्री हरामी यांनी हात उंचावून मतदान केले. तीन सदस्य गैरहजर होते. तर विरूद्ध बाजुने केशव भांडेकर यांनी मतदान केले.
या अविश्वास ठरावाच्या विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, नायब तहसीलदार एस. के. चडगुलवार, ना. त. जाधव यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)