नुकसानग्रस्त भागाची आमदारांकडून पाहणी
By Admin | Updated: April 29, 2016 01:36 IST2016-04-29T01:36:04+5:302016-04-29T01:36:04+5:30
देसाईगंज तालुक्याला बुधवारी गारपीटासह वादळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्यातील कोकडी, पोटगाव, पिंपळगाव, मोहटोला, किन्हाळा ...

नुकसानग्रस्त भागाची आमदारांकडून पाहणी
प्रचंड नुकसान : क्रिष्णा गजबे बांधावर
देसाईगंज : देसाईगंज तालुक्याला बुधवारी गारपीटासह वादळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्यातील कोकडी, पोटगाव, पिंपळगाव, मोहटोला, किन्हाळा या भागातील उन्हाळी धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागाची गुरूवारी आमदार क्रिष्णा गजबे यांनी बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
कडधान्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावेळी आमदार गजबे यांच्या समावेत देसाईगंजचे नायब तहसीलदार उपेश अंबादे, मंडल अधिकारी बुराडे, कृषी अधिकारी गोथे, गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे, सहायक कृषी अधिकारी देठे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार गजबे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करा, असे निर्देश प्रशासनाला दिले. कोकडी येथील रामदास सिताराम बुध्दे, गोपाळा बन्सोड, भूवन बन्सोड, मनोज बन्सोड या शेतकऱ्यांच्या शेतीचीही पाहणी त्यांनी केली. पोटगाव, पिंपळगाव, मोहटोला, किन्हाळा आदी भागातील शेतीला व नुकसान झालेल्या घरांना क्रिष्णा गजबे यांनी भेट दिली. यावेळी माजी सभापती परसराम टिकले, सरपंच बुध्दे, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. देसाईगंज तालुक्याच्या अनेक गावांना बुधवारच्या वादळाने प्रचंड फटका बसला आहे. (वार्ताहर)