धानोरा ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य संचालकांकडून पाहणी
By Admin | Updated: November 22, 2014 23:02 IST2014-11-22T23:02:46+5:302014-11-22T23:02:46+5:30
जिल्ह्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून धानोरा व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले. याबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे आरोग्य संचालक

धानोरा ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य संचालकांकडून पाहणी
धानोरा : जिल्ह्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून धानोरा व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले. याबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे आरोग्य संचालक यांनी धानोरा ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली.
भेटीदरम्यान आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी प्रत्यक्ष रूग्णांशी संवाद साधून प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्याचबरोबर रूग्णालय प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपचाराबाबतही रूग्णांना विचारले. धानोरा ग्रामीण रूग्णालयातील दोन डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रूग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही. बऱ्याचवेळा गडचिरोलीला रूग्ण रेफर करावा लागतो. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, संपूर्ण राज्यात ४० टक्के डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. राज्यातील जागा भरण्याचा विचार शासन करीत आहे. धानोरा ग्रामीण रूग्णालयाला तत्काळ डॉक्टर उपलब्ध करून द्यावे, असे आदेश उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना दिले. यावेळी सहायक हिवताप अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर, सहाय्यक संचालक डॉ. कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. शशिकांत शंभरकर, डॉ. रविंद्र ढोले, डॉ. काशिद, डॉ. धुर्वे उपस्थित होते.